मी सकाळी ऑफिसमध्ये काम करत बसले होते, विचारात मग्न होते. तेवढ्यात माझ्या नातीची, आरोहीची हाक आली – “आजी, तू काय करत्येस?” मी म्हणाले की मी ‘कलेचा आस्वाद’ या विषयावर एक ऑनलाईन ट्रेनिंग बनवते आहे, त्याचा विचार करते आहे. आरोही म्हणाली, कलेचा आस्वाद! हा काय प्रकार आहे? मी म्हणाले, कलेचा आस्वाद म्हणजे art appreciation. पण मग ह्याच्यात शिकवण्या किंवा शिकण्यासारखे काय आहे? आपल्याला एखादे आर्ट आवडते किंवा आवडत नाही. आरोहीचा प्रश्न तिच्या वयोगटाप्रमाणे बरोबर होता. मी तिला दिलेले उत्तर तुम्हा सगळ्यांना पण सांगावेसे वाटले म्हणून हा ब्लॉगचा खटाटोप.
प्रत्येकाच्या जीवनात सतत काहीतरी चढ-उतार सुरु असतात. जगभर, सगळ्यांना वेगवेगळ्या समस्या भेडसावत आहेत, ढासळत चाललेली आर्थिक परिस्थिती, युद्ध, हवामानबदल आणि बरेच काही. सामाजिक आणि वैयक्तिक पातळीवर वेग वेगळ्या प्रकारची आव्हाने येतच राहणार.
या सगळ्या परिस्थितीत आपल्याला जर कोणी दिलासा देत असेल तर ती म्हणजे कला. कोणाला गाणी ऐकायला आवडतात, कोणाला नाच, कोणी चित्र काढतो तर कोणी कविता. कलेचा आस्वाद घ्यायला तुम्ही फक्त कलाकारच असायला पाहिजे असे नाही बरं का. आपण फक्त रसिक असलो तरी चालते.
विचार करा की रसिक नसतील तर कलेला काही अर्थ राहील का? त्यामुळे कलेला कलाकार आणि रसिक दोन्हीही तितकेच महत्वाचे.
काही कला कळायला सोप्या तर काही कळायला कठीण. विचार करून बघा, कधी तरी आपल्या एखादे गाणे पटकन आवडते पण एखादे चित्र समजा कोणी समजावून सांगितले तर ते आवडायला वेळ लागतो.
प्रत्येकाची कलेची आवड आणि त्यातील गती वेगळी असते.
मी आरोहीला सांगितले त्या प्रमाणेच, प्रत्येकाला जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर कलेचा आस्वाद घेता आला पाहिजे. मला वाचनकला आवडते, लिखाण आवडते, गाणी ऐकायला आणि म्हणायला सुद्धा आवडतात बरं का.
मी माझ्या घरी, ऑफिसमध्ये वेगवेगळ्या कलात्मक वस्तू आणून ठेवते. त्या मला सुंदर दिसतात. मी जेव्हा या वस्तू विकत घेत असते तेव्हा त्या कुठे ठेवायच्या हे मी मनात आधी पक्के करते. उदाहरण म्हणून वरच्या फोटोतील बरणी बघा, तिला सुंदर झाकण आहे, हाताने बनवलेले सुंदर नक्षीकाम आहे. तुम्हाला लक्षात येईल की त्या बरणीखाली चपखल बसेल अशी बैठकही आहे. अशा छोट्या वस्तूं कडेही आपण कलात्मक अंगाने बघायला पाहिजे
मी अजून खूप माहिती देऊ शकते तुम्हाला कलेचा आस्वाद याबद्दल. पण इथे पूर्ण माहिती देण्यापेक्षा, तुम्ही मी आणि माझ्या टिमने बनवलेल्या अनेक मोड्यूल्सपैकी एक हे मोड्यूल जरूर बघा – Art Appreciation/कला आस्वादन https://lifeceo.in/product-category/social-skills/
- 26 May
- 2023